Song: Shivaji Raje Jai Ho
Music & Lyric:
Saneet S More (SANEETS)
देशा बाहेरची लोक पहा
करतायेत अभ्यास आपल्या राजांचा
आणि वाईट गोष्टी गोर्यांच्या
डोळे झाकून पाळतो आम्ही साऱ्या
बहुतेकांनी केला फक्त राजकीय वापरच माझ्या महाराजांच्या नावाचा
कट इतिहास वगळण्याचा यशस्वी करून त्यांनी दाखवला राजांचा
नष्ट झालं असतं आपल्या पूर्वजांच घर
कसं असतं जगणं आपले राजे नसते तर
शिवाजी राजे जय हो
शिवाजी राजे जय हो
वाचला असता तो राजांचा काळ
रोखला असता तो फाळणीचा जाळ
खरा अहिंसेचा अर्थ काय
पडला नसता हा प्रश्न ग माय
चित्रपटातल्या नट-नट्यां सारखं आंधळ्या प्रेमात पडायचं सर्व लोकांना
थोडं उरलं प्रेम तर द्यावं ते आपल्या देशातल्या चांगल्या कामांना सुद्धा
अत्यंत हुशारीन चाल चालवणे
गनिमी कावा शिवबाच्या काळी त्यास म्हणे
शिवाजी राजे जय हो
शिवाजी राजे जय हो
प्रेम व्यक्त राजांवर च करण्यासाठी नाही लागत भगवी वस्त्रे आणि फेटे
आपली चित्रे काढण्या ऐवजी टांगा राजांची तस्वीर मनाच्या भिंतीवरी
ताठ मानेनी जगणं
शिकलो आम्ही ज्यान कडंन
त्यांच एकेरी नाव घेताना
शरम येत का नाही त्यांना (देश विरोधी)
काळानुसार शत्रूला पहिलं ओळखण
त्याला पराभूत करून देश विजयी हो
शिवाजी राजे जय हो
शिवाजी राजे जय हो
Can keep a lot of good things about Shivaji Maharaj in front of you, but this song is just an eye opener for the common people of Bharat [India], not targeted towards any political leader but kept my thoughts in a general way, I hope you like the song and if you agree with the song words, Please share it with others, Thank You…!
Have a great day 🙂